इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृतीसाठी १४ नोव्हेंबरपासून सप्ताहाचे आयोजन

           कोल्हापूर दि. ८ : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृती प्रित्यर्थ १४ नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. बाल दिनाच्या निमित्ताने १४ ते २१ नोव्हेंबर कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द सप्ताह पाळण्यात येणार असून या कालावधीत धाडसत्र, जनजागरण मोहीम, चर्चासत्र, व्याख्याने आदि कार्यक्रम कोल्हापुरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्तांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
      शक्तीशाली भारत बनवण्यासाठी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तसेच सुशिक्षीत, निरोगी, समृध्द पिढी हीच राष्ट्राची खरी संपत्ती असल्याने बाल मजुरीला आळा घालणे गरजेचे आहे. बाल मजुरी  देशासमोरील गंभीर समस्या आहे. कामाच्या ठिकाणी मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही, शिवाय अल्प उत्पन्नात मुलांकडून काम करुन घेतले जाते. त्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जातो. यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. महाराष्ट्र राज्य बाल कामगार मुक्त करणे आणिसर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे शासनाचे स्वप्न असून ते सत्यात आणण्यासाठी बाल कामगार संबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, मुलांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करुन देणे तसेच बाल कामगारांसाठी विशेष कामकाम करणे, यासाठी सामाजिक जागृती करणे, चर्चासत्र, व्याख्याने आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.