इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १६ जून, २०१२

योग्य उपचार, विश्रांतीने कावीळ बरी होते - डॉ. अमोल पाटील


कोल्हापूर दि. 15 : कावीळ झालेनंतर घाबरुन न जाता विश्रांती, योग्य आहार व वेळेत योग्य उपचार घ्यावेत. काविळ पूर्णपणे बरी होते. पिण्याचे पाणी 10 मिनीटे उकळून थंड करुन प्यावे. हलका आहार घ्यावा. आहारामध्ये तेलकट, तिखट व मसालेदार पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी आज केले.
त्यांनी सांगितले की, कावीळ विषाणुजन्य रोग असुन तो टाईप ए, टाईप बी, नॉन ए, नॉन बी अशा विषाणुमुळे होतो यापैंकी टाईप ए व नॉन टाईप ए, नॉन टाईप बी या विषाणुमुळे होणारी काविळ दूषित पाण्यामुळे होते. रोगाची सुरवात एकदम होते तापाची कण कण, भुक न लागणे, मळमळ व पोटात अस्वस्थ वाटणे ही सुरवातीची लक्षणे असतात थोड्याच दिवसात कावीळ दिसु लागते.कावीळ अवस्था प्रथम लघवीचा रंग गडद पिवळा होतो, स्वच्छांस  फिकट रंगांचे होतो, डोळयांळा रंग पिवळा होतो व नंतर कातडीचा रंग विळसर होतो व अंगाला खाज सुटते.
कावीळ झालेल्या व्यक्तिच्या विष्टेतून  रोगांचा प्रसार होत असल्याने अशा रुग्णांना स्वतंत्र करावे व त्याच्या विष्टेच्या सार्वजनिक पाण्याशी संबध येणार नाही. अशा रितीने काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले, काविळ रुग्णांनी मांसाहार टाळावा. शिळे अन्न, उघड्यावरचे खाद्यपदार्थ व शितपेय घेऊ नयेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, शौचास जाऊन आलेनंतर हात साबणाने धुवावेत. गर्भवतींनी  स्त्रीरोगतज्ञ व फिजीशियन यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.